Headlines

आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आदिवासी जमात सामाजिक संस्थेचे निवेदन..

दिल्ली:आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत, होत असलेल्या अन्याय बाबत आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा.शरण खानापुरे दत्ता  सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैद्याता प्रमाणपत्र बाबत च्या प्रश्नावर प्रा. खानापुरे सरांच्या संकलित दस्तावेजासह  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. माननीय मंत्री महोदय दानवे यांनी  केंद्रीय आदिवासी मंत्री आणि राज्याच्या आदिवासी मंत्री ह्यांच्या सोबत बैठक घडवून आणण्यासाठी दिलेल्या निवेदन नुसार प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले

भविष्यात प्रश्न न मिटल्यास राज्यातील 80 ते 90 लाख अन्यायग्रस्त कोळी समाज आपल्या विरोधात उभा राहील अशी समज ही ह्यावेळी प्रा. खानापुरे सरांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

ह्या प्रसंगी  प्रा. खानापुरे यांच्या सोबत अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राज्याचे नेते सिध्दार्थ  कोळी,  आदिवासी जमात सामाजिक संस्थेचे दत्ता सुरवसे ,भालचंद्र सोनवणे सर,दत्तात्रय कोळी , दादा करकमकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *