Headlines

कोळी महादेव जमातीस सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा आम्ही येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये मतदानावर बहिष्कार टाकू – अमोल सारगे युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ लातूर

कासार बालकुंदा- निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे औसा विभाग सभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना कासार बालकुंदा येथे महासंघाचे लातूर जिल्हा युवा अध्यक्ष सारगे आणि त्यांच्या शिष्टमंडळांने निलंगा तालुक्यामध्ये कोळी महादेव जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात येत नाही त्यासाठी वैधता प्रमाणपत्र 1950 पूर्वीचे जुने पुरावे मागून जात प्रमाणपत्र सर्रासपणे फेटाळले जाते त्यामुळे निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला शबरी आदिवासी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती सामाजिक आरक्षणामार्फत मिळणारे अनेक सवलती पासून संपूर्ण लातूर जिल्ह्यातीलच आदिवासी कोळी महादेव समाज बांधव वंचित आहेत त्यांना जातीचे प्रमाणपत्र स्वरूप्तेने नाही मिळाल्यास येत्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असे निवेदन दिले आहे.

2014 ला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जी विद्यमान गृहमंत्री अमित शहा विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न शंभर दिवसांमध्ये सोडवतो असे सांगून कोळी महासंघाच्या मार्फत जाहीर पाठिंबा घेऊन आम्हा महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी समाजाचे मतदान घेऊन सत्तेत येऊन नऊ वर्ष झाले तरीही आम्हास अध्यापि न्याय दिला नाही त्याचा निषेध करून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. लातूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील सर्व जिल्हे मतदारावर बहिष्कार टाकतील यासाठी आम्ही समाज जागृती करू सर्व संघटना एकत्र करू अशी ही शिष्टमंडळातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिमन्यू पवार साहेब यांच्याकडे गाऱ्हाणे सांगितले.

आमदार पवार यांनी आपल्या भावना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासना च्या संबंधित विभाग यांच्याकडे पोहोचवण्याच आश्वासन देऊन आपल्या प्रश्नासाठी स्थानिक तालुका  जिल्हा प्रशासनालाही योग्य त्या सूचना देण्यात येतील असे सांगितले.

या निवेदनावर कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल सारगे यांच्यासह कासार बालकुंदा येथील ग्रामपंचायत सदस्य माधव याटेकरे,व्यंकट सारगे ,दयानंद सारगे, रानबा कावले, राम पिठले, अंकुश सारगे, भीम सारगे, अशोक बुग्गे, बालाजी बोयने , सचिन कावले , शिवाजी बक्के , शंकर बुगे उद्धव मुडे, रोहिदास मामडे ,धनराज सारगे, संदीप बेस्ते , विलास सारगे, सचिन कावले, जीवन वाघमारे, मसाजी सारगे,अंकुश सारगे , बालाजी सारगे यांच्यासह 100 आदिवासी कोळी समाज बांधवांच्या सह्या आहेत.

 

निलंगा तालुक्यातील कोळी महादेव जमातीस सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा आम्ही येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये मतदानावर बहिष्कार टाकू-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *