पाचोड: (शुभम घोडके प्रतिनिधी ) – जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटक यांच्यावरील दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश शोक संतप्त झाला आहे पाकिस्तान पुरस्कृत हा दहशतवाद असून सर्व स्तरातून विविध ठिकाणावर निषेध पुढचे कॅण्डल मार्च कडून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे लोकनेते छत्रपती संभाजी नगरचे लोकप्रिय खासदार संदिपान जी पाटील भुमरे आमदार विलास बापू संदीपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना पाटील भुमरे व युवा सरपंच शिवराज भैय्या राजू नाना पाटील भुमरे यांच्या नेतृत्वात पाचोड चौकामध्ये या भ्याड हल्ल्याच्या निषेध करून या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी युवा सरपंच शिवराज भैय्या भुमरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला याप्रसंगी कोळी महासंघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रकांत घोडके यांच्या सह अनेक कोळी समाज बांधव ,सरपंच, उपसरपंच , चेअरमन व ज्येष्ठ शिवसैनिक व बहुसंख्येने पाचोड वाशी नागरिक उपस्थित होते..
पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध , राजूनाना भुमरे यांच्या सह अनेक मान्यवरांनी निषेध करून श्रद्धांजली वाहिली..
