आज दि.29 आँगस्ट 2023 – रोजी वंचित बहुजन आघाडी निलंगा वतीने हारेगाव ता.श्रीरामपूर जि.नगर येथे काही मनूवादी,जातीवादी युवराज गलांडे पाटील व 4 साथीदार यांनी बौध्द युवकाला त्याच्या घरून दोन कामगार पाठवून शेतात घेवून जावून तू कबूतर चोरले म्हणून अमानूष रित्या बांधून झाडाला लटकवून मारहाण करून,थुंकी चाटायला लावून जातीय वाचक शिवीगाळ करून जिवेमारणेचा प्रयत्न करणार्यां नरधमाला अटक करून कठोर शिक्षा करावी,अन्यथा वंचित बहुजन आघाडी रसत्यावर उतरून श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या पिडित परिवाराला न्याय देण्याचे काम करेल असा ईशारा निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी निलंगा मार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ सुर्यवंशी,महिला जिल्हाध्यक्षा मंजूषाताई
लिंबाळकर,ता.उपाध्यक्ष दत्तू गायकवाड,शहर अध्यक्ष महमदभाई लालटेकडे,महासचिव रजनिकांत सोनकांबळे,ता.उपाध्यक्ष शाम मोरे,श्रीपाद कुलकर्णी,अविनाश कांबळे,नीरज कांबळे,नरसिंग एलके,मैहफूस खडके,सत्याभाई शिंदे,पांडूरंग पाञे,ज्योतीराम सुरवसे,भिमराव कांबळे अदि कार्यकरते मोठ्या संखेने उपस्थित होते.
हारेगाव येथील बौद्ध युवकांना मारहाण केल्याचा निषेध करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडी निलंगा शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिले, आरोपीना शासनाने कठोर शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी ..


