निलंगा (प्रतिनिधी)
दिनांक २० : निलंगा तालुक्यातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्तीला वेग देत आज अमोल ढोरसिंगे यांची निलंगा तालुक्यातील उपतालुकाप्रमुख व औराद शहाजानी शहरप्रमुख म्हणून लखन बोंडगे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
मा.पक्षप्रमुख मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते मा.आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते आ. सुनिल प्रभु , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख , आ.रोहिदासजी चव्हाण, लातूर जिल्हा प्रमुख, मा.आ. दिनकररावजी माने यांच्या सुचने नुसार आज नियुक्ती करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थिती तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे , निलंगा शहरप्रमुख सुनिल नाईकवाडे , शिवसैनिक गोविंद मोरे , विशाल सांडवे , राहुल डावरगावे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.


