Headlines

आज स्वातंत्र्य दिनी नियोजित अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या जागेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले भूमिपूजन … 

निलंगा तालुक्याचे आमदार मा. संभाजीराव पाटील यांच्या हस्ते निलंगा नगरपालिका परिसरामध्ये उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार संभाजीराव पाटील साहेब यांची भेट घेऊन मातंग समाजाच्या भावना आपण दुखावत असल्याचे त्यांच्यावर चर्चा केली. तीन वेळेस साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे नारळ आपल्या हातून फुटलेला आहे. आता हे तिसरं नारळ आपण नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये फोडत आहात आता याच्यानंतर आपण चौथे नारळ कुठे फोडू नये अशी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी यांनी विचारणा केली.व तालुका अध्यक्ष राम कांबळे यांनी मी आत्मदहन करेन अशी तीव्र नाराजी आमदार साहेबांना बोलण्यात आले. त्यावेळी मराठवाडा नेते अजय कांबळे ओम शिंदे रमेश कांबळे शिवाजी कांबळे श्रीधर कांबळे नागनाथ जी घोलप व सर्व मातंग समाजातील युवकांनी आमदार संभाजीराव पाटील यांना विचारणा केली व या निलंगा शहरांमध्ये सार्वजनिक असा स्वर्गीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुतळा ही आपण लवकरात लवकर बसून द्यावा अशी संघटनेच्या वतीने मागणी या ठिकाणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *