Headlines

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे आदिवासी कोळी समाजाचा मेळावा…

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा आज दिनांक २३/०४/२०२४ रोजी गंगाखेड येथे संपन्न झाला.

या मेळाव्यासाठी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले, सहसचिव सतीश धडे, ॲक्शन कमिट प्रमुख चंद्रकांत घोडके, जिल्हाध्यक्ष यादव महात्मे, परभणी लोकसभा अध्यक्ष बालाजी पालटवाड, प्रल्हाद मुरकुटे जिल्हाध्यक्ष, गुट्टे साहेब मित्र मंडळ,

संदीप पाटील जिल्हाध्यक्ष, रासपा, राहुल डोंगरे तालुकाध्यक्ष, मनसे,

अनंता अनवते जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ,

माऊली रेनेवाड, दादाराव नंदेवाड, रामा येटेवाड, मोहन येटेवाड, दत्ता झिलमेवाड, सुरेश इरले, विठ्ठल उमरे,

रामकिशन इरले,

प्रकाश तेलनगे, किशोर यांबालवाड, बंडू उमरे, बालाजी उमरे, तुकाराम एलकेवाड, राहुल पालटवाड,

बापूराव उमरे यांच्यासह कोळी महासंघ व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रमेश पाटील यांनी, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्येच आपल्या कोळी समाजाला न्याय मिळेल असे सांगितले. तसेच अनेक वर्षापासून आपल्या समाजाचा प्रलंबित असलेला जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याकरीता शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून हा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाची झपाट्याने प्रगती होत असून मोदींचे हात अधिक बळकट करण्याकरता सर्व आदिवासी कोळी बांधवांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *