Headlines

आदिवासी कोळी महादेव जातीचे प्रलंबित असलेले जात प्रमाणपत्र द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : बालाजी येणकुरे 

 

निलंगा तालुका प्रतिनिधी: उपविभागीय कार्यालय निलंगा कार्यालयात अनेक दिवसांपासून देवणी -निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या संचिका प्रलंबित आहेत त्या मुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा गांभीर्याने विचार करावा व आमच्या आदिवासी कोळी महादेव जातीच्या समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता जात प्रमाणपत्र द्यावे असे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे देवणी तालुकाध्यक्ष बालाजी येणकुरे, सामाजिक नेत्या अयोध्या ताई भोपळे, शोभा वाडकर, शांताबाई वाडकर, यशोदाबाई कार्ले, तिरवणबाई भोपळे, पारबताबाई भोपळे, पंचफुला ताई भोपळे,दिपक वाडकर,सुरज भोपळे, अभिषेक वाडकड, रोहित मुतखडे, बालाजी सूर्यवंशी, अभिषेक गरड इ.उपस्थित होते. अधिकारी यांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास उपविभागीय कार्यालया समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *