मुखेड: (शिवाजी गेडेवाड) मूखेड चे वैभव,ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी च्या सर्व भक्तांना,सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांना माहीत आहेच की महाराष्ट्र तेलंगाना व कर्नाटक सह अनेक राज्यातून भक्तांचे दैवत असणाऱ्या श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे जीर्णोद्धार साठी शासनाचा मोठा निधी उपलब्ध झाला आहे.त्याबद्दल शासनासह संबंधितांचे आभार!
आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे जीर्णोद्धार हे चांगलेच पण ते होताना *श्रद्धा स्थानाचे पावित्र्य* व इतर काही बाबींचा विचार विनिमय करण्यासाठी सर्वांना सूचित करण्यात येते की एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी समविचारी भाविक भक्त, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांनी उपस्थित रहावे अशी नम्र विनंती.
स्थळ:- वीरभद्र मंदिर
दिनांक:- २/१/२०२४ सकाळी ११वा.
आपले
*श्री वीरभद्र स्वामी भक्त सेवा मंडळ, मुखेड*
(बैठक आयोजक)


