Headlines

न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठा आरक्षणा संबंधीचा दुसरा अहवाल शासनाकडे सपूर्द…

नागपूर : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सुपुर्द करण्यात आला. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्मितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सर्वश्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, शंभूराज देसाई उपस्थित होते. यापूर्वी न्या शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *