Headlines

कोळी समाजातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता आणि हरहुन्नरी चित्रकार तानाजी कळकुटे यांचे निधन…

निलंगा,दि.२० निलंगा तालुक्यातील हाडगा या गावचे रहिवासी कोळी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कळकुटे यांचे निधन…

उत्कृष्ट पेंटर (चित्रकार) असणारे तानाजी चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील  शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारापेंटर चित्रकार तानाजी

मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर येथील सामाजिक कार्यकर्ता तानाजी सितांबर कळकुटे यांचं दि.२० ऑगस्ट २०२३ रविवार रोजी पहाटे ०२:३०वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ३८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवदेहावर  हडगा येथील येथील स्मशानभूमीत दि.२०ऑगस्ट २०२३ वार रविवार रोजी दुपारी ०२:०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंतीमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडील दोन भाऊ,दोन मुले, पत्नी असा मोठा परिवार आहे…त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *