परळी: आज परळी वैजनाथ आणि कण्हेरवाडी येथे कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडुकटले यांच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त परळी येथे महर्षी वाल्मीकी चौकामध्ये आदिवासी कोळी समाज बांधवांनी एकत्रित येवून प्रतिमा पूजन करण्यात आले .
त्याचबरोबर कन्हेरवाडी तालुका परळी येथे महषीॅ वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पूजन करू तेथील ग्रामस्थांच्या व कोळी समाज बांधवांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात
आली.यावेळी कोळी महासंघ बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडुकटले.यांच्या सह जेष्ठ समाजाचे नेते नंदुभाऊ बळवंत ,तालुकाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, राजकुमार बळवंत, वचित आघाडीचे नेते प्रशेजित रोडे,बालाजी कंडुकटले, . अजय बळवंत, हरिकिशन बहिरे,पिंटू सरवदे,विठ्ठल झिलमेवाड ,बाळु बळवंत, शाम माने, गोविंद कंडुकटले,गजानन माने,ऋषिकेश तलवारे,त्रिंबक कंडुकटले, प्रल्हाद बहिरे,हे उपस्थित होते .


