Headlines

ग्राम पंचायत कार्यालय सिरसी(धा.) तालुका लातूर येथील ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी

लातूर : येथे ग्राम पंचायत कार्यालय सिरसी व ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्राम पंचायत कार्यालय सिरसी यांनी जयंती निमित्त सिरसी धानोरा) येथील आदिवासी कोळी समाज बांधवांसाठी वाल्मीकी ऋषी चे  मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागेचा आज 8 अ दिला.  जयंती निमित्त खऱ्या अर्थाने सरपंचाने कायम स्वरुपी भेट दिल्याने त्यांचे आभार बाभळगाव चे पोलीस पाटील मुक्ताराम पिटले यांनी व्यक्त केले.

या वेळी सरपंच श्रीहरी कांबळे, उपसरपंच नितीन जाधव, पोलीस पाटील श्री मुक्ताराम पिटले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के,ग्रामसेवक श्री कलबोणै,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक तोडकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *