Headlines

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता देणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी…

Read More

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र – कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ची कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

मुंबई, दि. ६ :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.   आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या…

Read More

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे – केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत ..

मुंबई, दि. ५ : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.   केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा…

Read More

आदिवासी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आश्रमशाळेत आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. ०५ : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन होवून ही भाषा शब्दकोशांच्या माध्यमातून जतन व्हावी म्हणून बोलीभाषांचे शब्दकोश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.   मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी भाषेतील शब्दकोश प्रमाणित करण्याबाबत बैठक घेण्यात…

Read More

ॲड.चेतन रमेशदादा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मच्छीमार प्रकोष्टच्या संयोजक पदी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती…

नवी मुंबई: (सचिन रामाघरे)- नवी मुंबई येथील चेतन रमेशदादा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश मच्छीमार प्रकोष्ट संयोजक पदी ( राज्याच्या मच्छीमार सेलच्या अध्यक्षपदी ) निवड झालेली आहे. त्या निवडीचे  नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. ॲड .चेतन पाटील हे नवी मुंबई…

Read More

कोळी महादेव जमातीस सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा आम्ही येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये मतदानावर बहिष्कार टाकू – अमोल सारगे युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ लातूर

कासार बालकुंदा- निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे औसा विभाग सभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना कासार बालकुंदा येथे महासंघाचे लातूर जिल्हा युवा अध्यक्ष सारगे आणि त्यांच्या शिष्टमंडळांने निलंगा तालुक्यामध्ये कोळी महादेव जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात येत नाही त्यासाठी वैधता प्रमाणपत्र 1950 पूर्वीचे जुने पुरावे मागून जात प्रमाणपत्र सर्रासपणे फेटाळले जाते त्यामुळे…

Read More

सिल्व्हर पॉम्फ्रेट राज्य मासा घोषित , मत्स्यपालन आणि पशू संवर्धन करणाऱ्यांना पण किसान कार्ड मिळणार– मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई:  किसान क्रेडिट कार्ड परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉ म्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्याचे धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगीकारले आहे. या धोरणाला अनुसरुन गरीब, श्रमजीवी वर्गाचा विकास करण्याचे प्रयत्न विविध विकास योजनांच्या…

Read More

पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला

पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे…

Read More

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश – अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा…

मुंबई दि. ४: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

Read More

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले….

मुंबई, दि. ३ : स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले. या समितीच्या कामकाजाची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना ही माहिती प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल सहारा स्टार येथे खासदार श्री. कीर्तिकर यांचा ५७ वर्षांचा राजकीय प्रवास आणि लोकाधिकार चळवळीच्या…

Read More