Headlines

आंदोलकांच्या भावनांशी शासन सहमत; कायदा-सुव्यवस्थेसाठी शासनाला सहकार्य करा,मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २: “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले…

Read More

आदिवासीबहुल सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.१ : नाशिक जिल्ह्याच्या आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत…

Read More

कल्याणकारी योजना अंमलबजावणीत राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श निर्माण करू – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि. २ (जिमाका): स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला. नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते….

Read More

भाजीपाल्याचे बिट रात्री ऐवजी सकाळी चालू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल युवासेनेची मागणी

निलंगा- शहरातील भाजीपाला मार्केटचे बीट रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजीपाला मार्केटचे बीट, खरेदी विक्री रात्री अपरात्री दोन वाजता सुरू करण्यात येते, भाजीपाल्याची बिट रात्री ऐवजी सकाळी सहा…

Read More

कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. १ : निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरुपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ‘शून्य अपघात’…

Read More

शिवनेरीच्या इतिहासात महादेव कोळी समाजाच्या क्रांतिकारी पर्वाची व शुरत्वाची साक्ष देणारा कोळी चौथरा…

निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या आपसातील लढाया सत्ता पिपासू वृत्ती यात हकनाक भरडले जाणारे स्थानिक जनता आणि सैन्य याविरुद्ध  मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. त्यात छत्रपती शिवरायांचा  स्वराज्याच तोरण बांधण्याची शपथ घेण्याची मावळ्यांना दिलेली साद  याने प्रेरित होऊन , विर खेमा नाईक यांच्या नेतृत्वात मावलातल्या महादेव कोळ्यांनी एकत्र येवून…

Read More

आदिवासींच्या खेळांचा क्रीडा स्पर्धेत समावेश क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत निर्णय

मुंबई, दि. ३० : आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.   मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना…

Read More

अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री – आदिती तटकरे

मुंबई, दि. २९ : अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य शासकीय बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.   सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी…

Read More

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा पहिला हप्ता गतीने वितरित करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २९ : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा…

Read More

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे बैठक-महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.

मुंबई, दि. २९ :  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते. या…

Read More