निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या आपसातील लढाया सत्ता पिपासू वृत्ती यात हकनाक भरडले जाणारे स्थानिक जनता आणि सैन्य याविरुद्ध मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. त्यात छत्रपती शिवरायांचा स्वराज्याच तोरण बांधण्याची शपथ घेण्याची मावळ्यांना दिलेली साद याने प्रेरित होऊन , विर खेमा नाईक यांच्या नेतृत्वात मावलातल्या महादेव कोळ्यांनी एकत्र येवून शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या शुर महादेव कोळी सेनापतीं उल्लेख काही ठिकाणी आढळतो.
इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षितच राहिला आहे. महादेव कोळ्यांचा शिवनेरीवरिल संहार:
सुमारे 1667 च्या कालावधीतील पुणे परिसरातील छत्रपती शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.ह्यापूर्वी शिवनेरी किल्ल्याचा हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा
घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा समाज म्हणजे कोळी समाज. यात त्यांच्या व्यवसायावरून प्रामुख्याने दोन वर्ग पडतात, मासे मारणारे आणि शेती करणारे कोळी. शेती करणारे कोळी म्हणजे महादेव कोळी व मल्हार कोळी.
या जमातीचे लोक पूर्वी पासून पराक्रमी म्हणून ओळखले जायचे. त्यांचा परंपरागत व्यवसाय शेती करणे व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असला तरी दऱ्याखोऱ्यात राहणारे महादेव कोळी धाडसी व पराक्रमी होते. त्यांच्या या शौर्याच्या परंपरेमुळे डोंगरी किल्ल्यांच्या रखवालीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जात होती.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या कमी शस्त्र सामग्री आणि मोठ्या लढाईचा अनुभव नसलेल्या सैन्याने बलाढ्य मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर गडमाथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज ही त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या बलिदान दिलेल्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.
माहिती संकलन:सतीश धडे
संदर्भ: इंटरनेट वरील अनेक माहिती आधारे लिहलेले





महादेव कोळी समाज हा महाराष्र्टात दुर्गम डोंगराळ, द-याखो-यात राहणारा दुर्लक्षीत समाज असल्यामुळे जास्त अज्ञानी आहे.आशा पोष्ट आपणास कडुन आल्या तर समाज पर्यंत पोहचवणे सोपे होईल.व समाजाचा इतिहास समाजाला समजेल……
खुप चांगली माहिती आपण दिली……..
सूचना चांगली आहे प्रयत्न करू…