Headlines

शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं मुंबई, दि. ३ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार आज लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी…

Read More

सामाजिक कार्यकर्ते मा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून प्रशंसापत्र प्रदान..

निलंगा जि.लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय नरहरी सेनेचे ( राज्य संघटक ) मा.मोहन (भाऊ ) पोतदार यांनी गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियम व नियमाची जनजागृतीचे कार्य सार्वजनिक गणेशोत्सव काळात जनतेत वाहतुक नियमाचे पालन करण्यांचे उत्कृष्ठ असे कार्य केल्यांमुळे गणेश विसर्जनांच्या दिवशी लातूर वाहतुक पोलिस निरिक्षक मा.गणेश कदम साहेब यांच्या हस्तेमा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून…

Read More

ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्या-वस्त्यांना मिळणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ (जि.मा.का.वृत्त) ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्यावस्त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशही…

Read More

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

  मुंबई, दि. २५ : – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे….

Read More

बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता…

  *टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुप्रमास लवकरच मान्यता* *आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश* मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, रविवारी…

Read More

राज्यात ‘एक तारीख एक तास’ मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद; ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होत केली चौपाटी वर सफाई……

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१ : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली….

Read More

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप- विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी

मुंबई, दि. 28 : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त…

Read More

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल,…

Read More

एम. एस. स्वामिनाथन यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई , दि. २८:- ‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा तसेच शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारतमातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री…

Read More

रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार

डॉ. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख (डॉ. सी.डी. देशमुख) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा…

Read More