Headlines

सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांसाठी सन २०२३ -२०२४ पासून छत्रपती शाहू…

Read More

मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांचेमार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य 9…

Read More

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे जुलमी सत्तेविरुद्ध जनतेचा लढा’ डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रकट मुलाखतीतून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा

लातूर, दि. 15 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा या लढ्याला होती. निजामाच्या अन्यायी जुलमी सत्तेविरुद्ध जनतेने दिलेले हा लोकलढा होता. या लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे…

Read More

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना …सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

मुंबई, दि. १९ – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री…

Read More

आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आदिवासी जमात सामाजिक संस्थेचे निवेदन..

दिल्ली:आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत, होत असलेल्या अन्याय बाबत आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा.शरण खानापुरे दत्ता  सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैद्याता प्रमाणपत्र बाबत च्या प्रश्नावर प्रा. खानापुरे…

Read More

नवकल्पनांना दहा लाखापर्यंत भांडवल

मुंबई, दि. 18 : नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळणार आहे.   राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्याने नवउद्योजकतेचे स्वप्न…

Read More

बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महासचिव पदी ॲड.परमेश्वर गोणारे यांची निवड 

नांदेड ( प्रतिनिधी) :- बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार बसपाच्या महाराष्ट्र महासचिवपदी नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते ॲड. परमेश्वर गोणारे यांची आज निवड करण्यात आली असून ‘ बीएसपी आयी है, नई रोशनी लाई है ‘ ची घोषणाबाजी करीत या निवडीचे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Read More

महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत …

Read More

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय लातूर, दि. 17 (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण…

Read More

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य…

Read More