नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत: शिवसेना निलंगा
निलंगा: तालुक्यातील अनेक गावामध्ये मागील आठ दिवसापासून सतत रात्रंदिवस संततधार पाऊस पडत आहे, नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे. पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणीसाचून थांबल्यामुळे उडीद मूग झाडालाच उगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात असल्यामुळे…


