सिंचन प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि ७ :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश…


