Headlines

महाराष्ट्रातील कोळी समाजातील कर्तुत्वशील नेतृत्व आमदार रमेशदादा पाटील..

१५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा दिवस आहे. त्यानिमित्य आज तमाम महाराष्ट्रातील विविध संघटनांचे प्रमुख तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने गेल्या एक तपापासून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला जात आहे.
आमदार रमेश दादा पाटील यांच्या कारकिर्दी विषयी त्यानिमित्ताने कोळी समाज संदेश मध्ये माहिती द्यावी त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कारकिर्दीची मला माहिती सामायिक करावी म्हणून मी हा लेख आज लिहीत आहे.
ठाणे जिल्ह्यातील तळवली या कोळी बहुसंख्य असलेल्या रमेश दादा पाटील यांची जन्मगाव आहे. मच्छी व्यवसाय करत करत आपलं शिक्षण त्यांनी संपूर्ण केलं. त्यांचे वडील नारायण पाटील हे गावचे पाटील असल्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचाही वावर असल्यामुळे रमेशदादा पाटील यांना सुद्धा समाजकार्याची युवक अवस्थे पासूनच आवड होती.
लोक म्हणतात की रमेश दादा पाटील हे 2011 पासून एक संघटना काढून समाजकार्यात आले, पण मित्रांनो हे नितांत चूक आहे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कै. माजी आमदार कांतीभाई कोळी यांच्या सोबतही ठाणे जिल्ह्याच्या कोळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून रमेश दादा पाटील यांनी a त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात काम केलेले आहे.
समाज कार्य करत असतानाच त्यांना एक प्रकर्षाने जाणवले की समाजकार्य हे पुस्तकात लिहिल्याप्रमाणे फक्त विचारावर आणि चांगल्या कर्तुत्वात करता येत नाही ते करण्यासाठी साधन सामुग्री आणि पैशाची ही आवश्यकता असते . अशी जाणीव झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाकडे जास्तीचे लक्ष देऊन व्यवसाय केला.
उभ्या केलेल्या व्यवसायात तितका नफा मिळत नाही हे पाहून त्यांनी नवीन  सिडको संरचीत नवी मुंबईमध्ये येत असलेल्या अनेक नव्या एमआयडीसीच्या नव्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टर शिप सुरू केली. त्याबरोबरच कामगारा विषयीचे लढे असतील प्रकल्प ग्रस्ताचे हक्क असतील यांच्यासाठी सुद्धा लढत होते म्हणजे सामजिक कार्य करीत होते. हे करत असतानाच कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता आपल्या कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन डॉक्टर वकील आणि इंजिनियर बनवले. शिक्षण पूर्ण करून त्यांच्या मुलांनी व्यवसाय हातात घेतल्यानंतर 2011 ला माझे कार्य पूर्ण वेळ करायचं आता व्यवसायातून निवृत्ती घ्यायचा हा विचार घेऊन महाराष्ट्रभर दौरा केला आणि कोळी महासंघ ही नाना एकत्रित करणारी ना स्थापन करून गेल्या बारा वर्षापासून ते समाजाचे संघटन करीत आहे. 2011 मध्ये कोळी महासंघ या  संघटनेमध्ये अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांनी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रित संघटित केला.  महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत केल्यानंतर त्यांना जाणवलेल्या जात प्रमाणपत्राच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अडचणी बाबत आघाडी सरकारच्या विरोधात
2013 ला त्यांनी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला . त्या मोर्चाचा उद्देश विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देणे हा होता.
सागरी किनारपट्टीवर रहिवासी असूनही त्यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांच्या बरोबर  महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील लोकांसाठी त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्ना करिता पुन्हा 2014 ला देता की जाता हा विराट मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये तत्कालीन सत्ताधारी आघाडी सरकारचे कोणीही प्रतिनिधी आले नाहीत आणि त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कसलंही आश्वासन दिले नाही . मोर्चाकडे दुर्लक्ष केले मागण्यांकडे दुर्लक्ष केले म्हणून 2014 च्या लोकसभा  निवडणुकीमध्ये चाळीसगाव येथे महाराष्ट्रातील  कोळी समाजाचा भव्य मेळावा घेऊन, भारतीय जनता पार्टीला तत्कालीन अध्यक्ष अमित भाई शहा यांच्या उपस्थितीत  पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार २०१४ ला सत्तेत आणले. भाजपा सेनेच सरकार सत्तेत येण्यामध्ये मोलाचा वाटा कोळी समाजाच्या आहे हे सरकारच्या ध्यानात वारंवार आणून दिले. त्याबरोबर वारंवार  कोळी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत  त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  त्यांचे कार्य त्यांची धडपड बघून तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेच्या भाजपाच्या कोट्यातील आमदार पदासाठी निवड करून त्यांना आमदार केले. हा त्यांच्या समाज कार्यास हे एकप्रकारे  प्रोत्साहन दिले असे म्हटले तर वावगे नाही .
आजही 2014 ला दिलेल्या देता की जाता मोर्चाच्या माध्यमातून दिलेल्या  वचनाच्या पूर्तीसाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे. कोळी महासंघ हे संघटन बळकट करण्यासाठी, दिवसरात्र मेहनत करणारा, समाजाच्या प्रश्नासाठी अहोरात्र पाठपुरावा करणारा , समाजातील आडल्या पडलेल्या नडलेल्या लोकांना, गरज वंतांना मदत करणारा आज महाराष्ट्रामध्ये जर कोणी नेता असेल तर ,

एकमेव नेता आहे विद्यमान विधान परिषदेचे आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील…..
अशा या प्रयत्नशील आणि कर्तृत्वशील नेतृत्वाला कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो…सतीश धडे संपादक कोळी समाज संदेश 

Happy Birth Day Dada :-  Satish Dhade Editor Koli Samaj Sandesh 

2 thoughts on “महाराष्ट्रातील कोळी समाजातील कर्तुत्वशील नेतृत्व आमदार रमेशदादा पाटील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *