काल दिनांक ४एप्रिल २०२५ रोजी कोळी महासंघाची राज्यस्तरीय महासभा संपन्न झाली . या महासभेत संघटनेच्या मजबुती साठी आणि समाजाच्या विकासात्मक धोरणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय पदावर नियुक्ती करण्यात आली.
कोळी महासंघाचे अध्यक्ष पदी मा. आमदार रमेशदादा पाटील यांची कार्याध्यक्ष पदी प्रकाश बोबडी आणि सरचिटणीस पदी पुनश्च राजहंस टपके यांची निवड करण्याचा ठराव या महासभेत पारित करण्यात आला…
त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी कोळी महासंघाच्या कार्यकारी मंडळात युवा अध्यक्ष पदी ॲड. चेतन पाटील, उपाध्यक्ष पदी शिवशंकर फुले , सहसचिवपदी सतीश धडे, कार्यकारिणी सदस्य पदी प्रा, सुरेश पाटकर आणि.चंद्रकांत घोडके यांची नियुक्ती करण्याचा ठराव मांडला त्यास राजहंस टपके आणि प्रकाश बोबडी यांनी अनुमोदन दिले.

ही सभा संघटनात्मक असल्याने संघटनेच्या मजबुती साठी प्रयत्न करण्याचा मनोदय अनेक नवनिर्वाचित जुन्या नव्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला….


