Headlines

कोळी महासंघ चे नाशिक संपर्क प्रमुख युवराज सैदाने यांना अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार २०२४ प्रदान

नाशिक: “ध्यास कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा!” या ब्रिद वाक्याने सुरुवात केलेली कोळी “समाज संघटनाची शिखर संस्था” *कोळी महासंघ* या संस्थेचे नाशिक शहर संपर्क प्रमुख तथा भाजपचे नवीन नाशिक चिटणीस श्री युवराज चिंतामण सैंदाणे यांना *महा एनजीओ आणि सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे व जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळ सोनगीर तालुका व जिल्हा धुळे* यांनी आयोजित *अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार २०२४* काल दिनांक 14/01/2024 रविवारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कोळी महासंघाने केलेल्या महाराष्ट्र राज्यात समाजासाठी उल्लेखनीय कामाचा मोबदला म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर संपर्क प्रमुख म्हणून हा पुरस्कार महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष मा.श्री.शेखर मुंदडा (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते आणि धुळे महानगरपालिका उपायुक्त मा.पल्लवी शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महा एनजीओ फेडरेशनचे जेष्ठ संचालक श्री मुकुंद शिंदे, सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मीनाताई भोसले, राष्ट्रीय सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी डॉ. संजय पाटील, सिव्हिल सर्जन तथा आयएमए अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, जोशोबा सांस्कृतिक क्रिडा मंडळचे अध्यक्ष श्री दिलीप माळी, धुळे रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री दिपक अहिरे यांच्या उपस्थितीत एकुण ३१ संस्था / संघटनांचे पदाधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले असून त्यात नाशिक येथील तळमळीने काम करणाऱ्या कोळी महासंघाचे शहर संपर्क प्रमुख तथा आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिकचे संस्थापक आणि भाजपाचे नवीन नाशिक चिटणीस श्री युवराज चिंतामण सैंदाणे यांना पुरस्कार देण्यात आला.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आमदार मा. श्री.रमेशदादा पाटील, कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे मच्छिमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अँड. चेतनदादा पाटील, नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ.सिमाताई हिरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमचे मार्गदर्शक प्रदीप पेशकार, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, मंडळाध्यक्ष अविनाश पाटील, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश बोबडी, कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागरशक्तीचे संपादक श्री राजहंसजी टपके, कोळी महासंघाचे सचिव तथा कोळी समाज संदेशचे संपादक श्री सतीशजी धडे यांनी अभिनंदन केले.तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष मा. गुलाबराव गांगोडे, पंढरीनाथ पिठे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजलीताई अभंग, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राजकोर, शहर युवाध्यक्ष नितीन शेवरे आणि समाज बांधव यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *