रब्बी पीक विमा भरा व ई पीक पाहणी 2023 सुद्धा करा..
पीक विमा का आवश्यक आहे…?
बदलत्या हवामानामुळे आपल्या पिकाचे खूप नुकसान होत आहे ,त्यामुळे पिकाची नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत किंवा अनुदान मिळवण्यासाठी पीक विमा भरणे आवश्यक आहे.
तरी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी पिकाचा विमा भरून घ्यावा व जे जे पिकं विम्यामध्ये भरले आहेत त्याची ई पीक पाहणी करून घ्यावी .
विमा पावती वरील पिकाचे क्षेत्र व ई पीक पाहणी मधील क्षेत्र अगदी बरोबर असावे , कमी किंवा जास्त नसावे…
ई पीक पाहणी केल्या शिवाय पीक विमा किंवा कोणतेही शासकीय अनुदान ,मदत मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी .
गहू , ज्वारी , हरभरा
या पिकांचा विमा भरता येईल …
तरी ज्या शेतकरी बांधवांना विमा भरायचा त्यांनी संपर्क करावे.


