Headlines

जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सह इशारा ..

अमरावती: आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला की अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला जर शासनाने लवकर दाद देवून न्याय नाही दिला तर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज  ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .

दिलेलं निवेदन खालील प्रमाणे…

प्रती

,मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्याभवन, मुंबई

मार्फत मा. तहसील कार्यालय दर्यापुर ता. दर्यापुर जि. अमरावती

विषय :- आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाज बांधव जळगाव येथिल जिल्हाधिकारी कार्यलयासामोर अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या बांधवाना पाठींबा देण्याबाबत.

महोदय,

दिनांक १०/१०/२०२३ पासुन जळगाव कार्यलयासमोर आदिवासी कोळी महादेवजमातीचे बांधव खालील अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. जिल्हा अधीकारी मुख्य मागण्याकरीता

मागण्या:- १) कोळी महादेव समाजाला अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. २) अनुसुचीत जमातीच्या प्रमाणपत्रास जातवैद्यता प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे

या मुख्य माण्याकरीता बसलेल्या उपषोण कर्ताना तात्काळ न्याय मिळण्याकरीता अमरावती जिल्हातील सर्व आदीवासी कोळी महादेव समाज बांधवाचा पुर्ण पाठीबा तथा समर्थन देत आहोत. आदीवासी कोळी महादेव लोकाना लवकर न्याय न मिळाल्यास अमरावती जिल्हास सुध्दा मोठया प्रमाणात आदीवासी कोळी महादेव जमातीचे लोक उपोषणाला बसणार आगामी काळातील सण उत्सव बघता प्रशासनावर कुठलाही तान येऊ नये म्हणुन जळगाव जिल्हातील उपोषण कर्ताण्या लवकरात लवकर न्याय देऊन सपुर्ण आदिवासी कोळी महादेवजमातीच्या लोकांना न्याय देण्याची मागणी आपनास या पत्राव्दारे करण्यात येत आहे. ८ दिवससाच्या आत जर कोळी माहदेव समाजला न्याय मिळाला नाही तर जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार किंवा रस्ता रोको आंदोलन करीतल यांचे सपुर्ण परिणाम महाराष्ट्रात दिसुन येतील या सर्वाची जबाबदारी प्रशासन शासन वर राहील याची नोंद घ्यावी.दर्यापुर  जिल्हा अमरावती येथील आदिवासी कोळी समाज  संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रघुनाथजी इंगळे, गणेशराव बोपटे, योगेश बुँदे, सतीश काळे, ओमप्रकाश कुठेमाटे, संदीप भवर, उत्तमराव जामनेकर, रोशन ठाकरे, सुधीर तराळे, तुळशीदास अडबोल व तालुक्यातील असंख्य आदिवासी कोळी महादेव जमातीचे बांधव उपस्थित होते.

One thought on “जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सह इशारा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *