जळगाव:आज दिनांक 17/10/2023 रोजी आदिवासी जमातीचे अभ्यासक आणि अध्यक्ष प्रा. डॉ.शरण खानापुरे व कार्याध्यक्ष .दत्तात्रय सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली नंदूरबार जिल्ह्यातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष किरण सोनवणे यांचा औपचारिक रित्या सत्कार करण्यात आला.तसेच जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी बसलेले बापूसो.जगन्नाथ बाविस्कर आणि अन्य 4 उपोषणकर्ते यांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटना कार्याध्यक्ष आदी. दत्तात्रय सुरवसे, यांनी त्याच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला .
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष किरण भाऊ सोनवणे, राकेश कुवर, किशोर चित्ते, संजय सोनवणे, मनोहर ईशी, प्रदीप महाले, राजेंद्र वाघ, मनोहर कोळी, सचिन सोनवणे, विनोद सोनवणे, दीपक साळुंखे, आनंद सोनवणे, जयेश महाले, जीवन वाघ हे कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषण स्थळी आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय सुरवसे यांनी आपल्या भाषणात आदिवासी कोळी जमातीच्या वैधानिक मागण्या, राजकारणातील नेत्यांचा हस्तक्षेप, तसेच शासकीय निर्णय डावलून आदिवासी कोळी जमातीला वंचित ठेवण्याचे षडयंत्र केल्याचे सांगितले. साडे नऊ टक्के गणती च्या नुसार येणार केंद्र व राज्य शासनाचा निधी आदिवासी कोळी जमाती पर्यंत पोहचू न देता केवळ आदिवासी क्षेत्रातील काही ठराविक तीन चार टक्के जमातींनाच लाभ देत आहेत, आणि उर्वरित महाराष्ट्रातील पाच टक्के लोक या पासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्या जातात असे सांगितले.त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या जमातीमधून राजकीय नेतृत्व आणि मताच वर्चस्व निर्माण व्हावे लागेल .आपल्यातील आदिवासी कोळी बांधवांना येत्या निवडणुकामध्ये उमेदवारी घेऊन आपली राजकीय ताकद दाखवून द्यायला पाहिजे . आपले नेतृत्व उभे राहिले तर त्यांच्या मागे आपल्याला धावण्याची गरज भासणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले.
दत्तात्रय सुरवसे यांनी त्यांच्या आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना विस्तार करण्याचे त्यात सामील होण्याचे आवाहन सर्व आदिवासी कोळी बांधवांना केले आहे.



