Headlines

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार : धनंजय मुंडे

  नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून पाहणी नागपूर दि.२ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

  मुंबई, दि. २५ : – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे….

Read More

राज्यात ‘एक तारीख एक तास’ मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद; ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होत केली चौपाटी वर सफाई……

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१ : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली….

Read More

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप- विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी

मुंबई, दि. 28 : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त…

Read More

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल,…

Read More

बहुजन समाज पार्टी आदिवासी कोळी जमाती बीड लोकसभा प्रभारी पदी प्राध्यापक सुनील बळवंते यांची निवड.. प्रदेश महासचिव परमेश्वर गोणारे व प्रदेश प्रभारी मनीष कावळे यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र…

दिनांक 28 सप्टेंबर 2023:  बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे बहुजन समाज पार्टी च्या आदिवासी कोळी जमात बीड लोकसभा प्रभारी पदी प्राध्यापक सुनील बळवंते यांची निवड महाराष्ट्राचे प्रदेश प्रमाणे मा. मनीष भाऊ कावळे व महाराष्ट्राचे महासचिव माननीय परमेश्वर गोणारे व महासचिव मा. दिगंबररावजी ढोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी बीड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी कोळी जमातीचे समाज बांधव…

Read More

रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार

डॉ. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख (डॉ. सी.डी. देशमुख) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा…

Read More

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद –

कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा…

Read More

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर..

  ♦मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती…♦ मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची…

Read More

निलंगा तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या हस्ते शिवसेना गणेश मंडळाच्या बाप्पांची आरती संपन्न..

निलंगा/प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथील शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने श्री गणरायाच्या आरतीचा मान निलंगा तहसीलच्या तहसीलदार आदरणीय श्रीमती उषाकिरण शृंगारे ताई यांना देण्यात आला यांच्या शुभहस्ते आज सकाळची आरती संपन्न झाली यावेळी शिवसेना गणेश मंडळाच्या वतीने तहसीलदार शृंगारे ताई यांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे…

Read More