Headlines

ॲड.ओमगशद (मनोज) बोईनवाड –  यांची आखिल भारतीय कोळी समाज दिल्ली या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्षपदी नियुक्ती 

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाचे वकील , वकिली बरोबर  सामाजिक कार्य ही करणारे , अँड.ओमगशद (मनोज) बोईनवाड  ( विधीज्ञ, हायकोर्ट, औरंगाबाद ) यांची आखिल भारतीय कोळी समाज दिल्ली,  या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.महाराष्ट्रातील प्रामुख्याने मराठवाड्यातील आदिवासी  कोळी महादेव,कोळी मल्हार, टोकरे कोळी या जमातीच्या प्रश्नासाठी सतत…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय अक्टोबर २०२३ निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील…

Read More

शेळी पालनातून महिला बचतगटांचे होईल सक्षमीकरण व थांबेल कुटुंबांचे स्थलांतर : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 : केंद्र सहाय्य योजनेतून महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच…

Read More

दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 1 : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक अशा नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ अशासकीय संस्थांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे. संस्थांनी पुढील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. अटी व शर्ती: 1)स्वयंसेवी…

Read More

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन..

मुंबई, दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना…

Read More

सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग महामंडळामार्फत योजना राबविणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 31 : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या महामंडळांच्या योजनांच्या धर्तीवर शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्या…

Read More

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 30 : नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री डॉ.गावित म्हणाले की,…

Read More

हदगाव – हिमायत नगर जिल्हा नांदेड येथील आदिवासी कोळी समाज संघटनेचा जळगाव जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

जळगाव जिल्यातील अन्नत्याग उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन हदगाव – हि.नगर तालुक्या हिमायतनगर (प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी ,महादेव कोळी, मल्हार यांच्या अन्नत्याग उपोषणाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यात प्रलंबित असलेल्या उपविभागीय कार्यालयातील कोळी महादेव जमातीचे जातीचे प्रमाणपत्र तात्काळ शासनाने द्यावे यासाठी दि 30 ऑक्टोंबर रोजी येथील तहसीलदार…

Read More

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३०: मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि ते न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री…

Read More