कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी ट्रॅक्टरचे वितरण – पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड, दि. १६;- पीक विम्याची अग्रीम रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन आज यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन…


