विविध सादरीकरणाच्या माध्यमातून संगीत, नृत्य, संस्कृतीचा अप्रतिम आविष्कार , पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे दि.२२: गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही श्री.महाजन…


