केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र गरजूपर्यंत पोहोचवा
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, वंचित, गरजूपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अपर पोलीस अधीक्षक…


