भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. २२ : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास…


