महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत …


