Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक पारदर्शक व सुलभ करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक पारदर्शक व सुलभ करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जात वैधता प्रमाणपत्रांचे सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे महाराष्ट्र…

Read More

कोळी महासंघाचे अध्यक्ष, मा. आमदार रमेश दादा पाटील यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा तथा मा.केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची भेट घेऊन आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नावर चर्चा

नवी दिल्ली:राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा तथा मा.केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती दीदी यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या नवीन कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांचा सन्मान करून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या अत्यंत सकारात्मक भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शवत, त्या…

Read More

एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

२२ एप्रिल २०२६ : (मुंबई)-एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री…

Read More

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिवंगत नेते अनंत तरे यांच्या सह कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता

ठाणे: (योगेश कोळी)- दिवंगत अनंत तरे साहेबांचा धुळे कोर्टातील न्यायीक लढा जिंकला……. अखेर धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता केली… धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 ऑगस्ट 2009 रोजी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अनंत तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जातीच्या दाखला सुलभतेने मिळणे जात वैधता प्रमाणपत्र मिळणे…

Read More

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने ठाणे येथे आयोजित वधुवर मेळावा संपन्न

दिनांक 29 /3/26- (सिद्धार्थ कोळी)- रोजी रविवारी महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष परेश भाई कोळी ह्यांच्या नेतृत्वखाली “ठाणे जिल्हा कोळी भवन ” मध्ये कोळी समाजाचे वधुवर मेळावा शेकडोच्या युवा युवतीच्या उपस्थित मध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रीय महामंत्री डी. पी. शंखवार साहेब ह्यांच्या अध्यक्षातेखाली करण्यात आला. ह्यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेव बुवा शाबाजकर, प्रदेश कार्याध्यक्ष…

Read More

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read More

माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी गावीत परिवाराच्या वतीने नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्षाच्या नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा!

नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांना नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्ष सुखाचे समृद्धीचे जावो; अशा शुभेच्छा गावीत परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी समस्त नागरिकांना दिल्या आहेत. आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी श्री शालिवाहन शक १९४८ पराभव नाम संवत्सर कलियुग शक ५१२८ या नुतन हिंदू…

Read More

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग; 

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग;  ऑपरेटर गंभीर भाजला ……….. निलंगा बस स्थानकात आज सायंकाळी ८ वाजता डिझेल भरत असताना एसटी बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत डिझेल भरणारे ऑपरेटर बसवराज मठपती हे गंभीररित्या भाजले असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळेवर…

Read More

कोळी महासंघाचे उपाध्यक्ष दलितमित्र नाटककार अभिनेते रामकृष्ण केनी यांचे निधन

कोळी महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष, शिवसेनेतील एक जेष्ठ नेते व मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते दलितमित्र नाटककार , अभिनेते रामकृष्ण केणी  यांचे दुःखद निधन झाले आहे . आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र सुभतेने मिळण्याबाबत च्या प्रश्नावर करण्यात आले ल्या अनेक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.. त्यांचे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक पद जात पडताळणीच्या वरवंट्यात…

Read More

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले.

राम मालेवाड (नांदेड)– महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंगाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर  यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, आदिवासी आमदार मा. केराम…

Read More